बोल अनुभवाचेमुख्य स्टोरी

नमस्ते मी अनन्या बोलतेय…

आता भेटूया दर सोमवारी..

जगण्याची समृद्धी नात्यात असते..आणि नात्याची विश्वास आणि सन्मानात असते…वर्षभर अनेक अनुभवांनी अनेक धडे मिळाले…कुणी वाकुल्या दाखवल्या..कुणी गरज नसताना स्पर्धा तयार केली…कुणी नाती तोडली..कुणी विश्वासाने वापर करून घेतला… ज्याच्या त्याच्या योग्यतेने आसपास चे जन जोडले गेले… जबाबदारीची वेळ आली की… चुका शोधू लागले… नाती जपताना मनापासून नाही तर सोयीने स्वार्थाने गरजेपुरती जपली…

2025 ने इतकं शिकवलं…
आणि यातूनच निश्चित केलं… पत्रकारितेचा समृद्ध अनुभव… वकिलीत स्थिरावताना आलेले विविध अनुभव… एक क्षेत्र यशस्वी रित्या पूर्ण करून… नव्या क्षेत्रात प्रवेश करताना… झालेली मानसिक, आर्थिक, सामाजिक कौटुंबिक दमछाक… लोकांचा स्वीकार आणि नकारही…सन्मान आणि अपमानही… माझ्याकडून झालेल्या चुका… आणि माझ्याबाबत झालेल्या टिंगल टवाळी… थट्टा.. खूप काही… यातून मनाला समाधान देणारे केलेलं काम… मिळालेलं यश…
अशा सगळ्यातून दर दिवशी देवाला नमस्कार करताना स्वतःमध्ये निर्माण होणारी आश्वासकता… असे खूप काही शब्दात मांडायचे… ज्यांना उत्सुकता आहे ते वाचतील आणि ज्यांना खरेच समजून घ्यायचं आहे ते घेतील… पण लेखक आणि पत्रकार या नात्याने मला पुन्हा एकदा लिहिती व्हायचं आहे…. माझ्या अव्यक्त अनुभवांना समोर ठेवायचे आहे….
वकिलीत नव्याने येणाऱ्या.. किंवा आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर नवे काही सुरू करू यासाठी प्रयत्न करणाऱ्या… सर्वांसोबत माझा हा संवाद असेल… कदाचित… यातून मीच मला नव्याने भेटेन…. म्हणूनच… योगिनी नाही तर…
नमस्ते मी अनन्या बोलतेय…🙏
हा शब्द प्रपंच …नव्या वर्षात..दर सोमवारी…. गार्गी च्या डिजिटल व्यासपीठावर … .🙏

Related Articles

Back to top button