मुख्य स्टोरी

वकील सोसायटीच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलच्या प्रचारास उत्साहात प्रारंभ

नाशिक : नाशिक येथील दि नाशिक डिस्ट्रिक्ट अ‍ॅडव्होकेटस मल्टीपर्पज को ऑप सोसायटी लि. नाशिक या वकिलांच्या सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचारास गुरुवारपासून जोरदार शक्तिप्रदर्शनाने सुरुवात झाली. यंदा प्रस्थापितांना धक्का देण्यासाठी नव्या-जुन्या संचालकांनी आपल्यासोबत नवे चेहरे घेत परिवर्तन पॅनलची मोट बांधली आहे.

परिवर्तन पॅनलमध्ये ज्येष्ठ विधीज्ञ रमेश कुशारे, कुरेशी आशिक शरीफ, कुलकर्णी चंद्रशेखर, खराटे प्रभाकर, खांडबहाले अरुण, जाधव शशिकुमार, ठाकरे भरत, दातीर विश्वनाथ, देवरे चंद्रशेखर, बोराडे सोमनाथ, रक्ताटे सुधाकर, निफाडे सोनल (कदम), पवार प्रेमनाथ, राऊत स्वप्ना, आव्हाड सुरेश, शिंदे प्रकाश, शिंदे जगदीश या वकिलांचा समावेश आहे.

प्रचाराचा शुभारंभ जिल्हा न्यायालयाच्या आवारात मोठ्या उत्साहात करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ वकील अशोक खुटाडे, झुलकर जागीरदार, अजित पाटील, अशोक रुमणे, सौरभ बस्ते, यतीन वाघ, उदय शिंदे, सुनील दरगोडे, प्रकाश वाघ, शुभांगी आवारे, शुभांगी कडवे, वृषाली शिरसाठ, अश्विनी जाचक, ॲड. पिरजादे, सोमनाथ घोटेकर, शरद मेढे, सुनील बोराडे, बाळासाहेब पगार, बाळकृष्ण ठाकरे, रमेश ढेमसे, शिवाजी चव्हाण, रामचंद्र आहेर, राजेश आव्हाड आदी उपस्थित होते.

 

Related Articles

Back to top button