मुख्य स्टोरी

परिवर्तन पॅनलला कळवण, मालेगावमधील वकिलांचा उस्फूर्त पाठिंबा

नाशिक : दि नाशिक डिस्ट्रीक्ट अ‍ॅडव्होकेट्स मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी लि., नाशिक या संस्थेच्या दि. १० मार्च २०२३ रोजी होवू घातलेल्या सन २०२३-२०२८ च्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांनी सोमवारी कळवण, मालेगाव येथे भेटी देऊन वकील बंधू-भगिनींशी संवाद साधला. या प्रचार दौऱ्यात परिवर्तन पॅनलचे सर्व उमेदवार तसेच कळवण, मालेगाव न्यायालयातील वकील संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी परिवर्तन पॅनलची भूमिका सभासदांना समजावून सांगण्यात आली.

 

परिवर्तन पॅनलच्या वतीने सर्वसाधारण गटातून मतपत्रिकेवरील अनुक्रमांकानुसार २. कुरेशी आशिक शरीफ, ३. कुलकर्णी चंद्रशेखर बाजीराव, ४. कुशारे रमेश बाळनाथ, ५. खराटे प्रभाकर निवृत्ती, ६. खांडबहाले अरुण बालाजी, ९. जाधव शशिकुमार हिरामण, ११. ठाकरे भरत मुरलीधर, १३. दातीर विश्वनाथ काळू, १४. देवरे चंद्रशेखर शिवाजी, १७. बोराडे सोमनाथ नामदेव, २२. रक्ताटे सुधाकर तुळशिराम, २४. शिंदे जगदीश सुरेश; तर अनु. जाती/जमाती प्रवर्गातून ०१. पवार प्रेमनाथ केरूजी; इतर मागासवर्ग प्रवर्गातून ०२. शिंदे प्रकाश बाळासाहेब तसेच विमुक्त जाती/भटक्या जमाती (NT गट) प्रवर्गातून ०१. आव्हाड सुरेश रामभाऊ निवडणूक लढवत आहेत. महिला राखीव गटातून ०१. राऊत स्वप्ना दीपक, ०३. निफाडे सोनल सुरेश निवडणूक लढवत आहेत.

नाशिक जिल्हा वकील सोसायटीच्या या निवडणुकीत प्रस्थापितांची एकााधिकारशाही मोडीत काढून लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी परिवर्तन पॅनलची निर्मिती केल्याचे तसेच सभासद वकिलांचा सर्वांगिण विकास तसेच संस्थेची उन्नती असाच परिवर्तन पॅनलचा संकल्प असल्याचे मनोगत उमेदवारांनी व्यक्त केले. परिवर्तन हा निसर्ग नियम आहे, प्रस्थापितांचे वर्चस्व आणि एककल्लीपणा संपुष्टात आणण्यासाठीच सभासद बंधू आणि भगिनींनी परिवर्तन पॅनलच्या ‘छत्री’ या निशाणीलाच मत देवून पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन उमेदवारांनी सभासदांना केले. या प्रचार दौऱ्यात कळवण, मालेगावमधील वकील बंधू-भगिनींच्या वतीने परिवर्तन पॅनलला उस्फूर्त पाठिंबा दर्शविण्यात आला.

Related Articles

Back to top button