एक ब्लॉकबस्टर;, ३ सुपरस्टार… ४ वर्षात तिघांचाही मृत्यू!
१९८९ च्या ‘चांदनी’ या अमर प्रेमकथेतील कलाकारांची शोकांतिका

मुंबई : आजकाल हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे. यामुळेच अनेक कलाकारांनीही आपला जीव गमावला आहे. असेच तीन सुपरस्टार ज्यांनी एकाच ब्लॉकबस्टर सिनेमात काम केलं. मात्र ते आज आपल्यात नाही. तिघांनीही जगाचा निरोप घेतला आहे.
हा सिनेमा म्हणजे १९८९ साली आलेला ‘चांदनी’ … त्या दशकातील एक अमर प्रेमकथा. यश चोप्राच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात श्रीदेवी, ऋषी कपूर आणि विनोद खन्ना यांच्या अभिनयाची जादू पहायला मिळाली. आज या तिघांपैकी एकही कलाकार हयात नाहीत. एका ब्लॉकबस्टर सिनेमातील ३ सुपरस्टार कलाकारांचा ४ वर्षात मृत्यू झाला. या चित्रपटातील प्रमुख भूमिका साकारणाऱ्या श्रीदेवी यांचे २०१८ मध्ये दुबईत एका लग्नसमारंभादरम्यान अकस्मात निधन झाले. हृदयविकाराचा झटका ही कारणामुळे निधन झाल्याचं सांगितलं. तिच्या अचानक निधनाने सारा देश हळहळला.
विनोद खन्ना यांना कर्करोग झाला होता आणि त्यांनी २०१७ मध्ये उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि आवाज अजूनही लोकांच्या मनात घर करून आहे. ऋषी कपूर यांचं ३० एप्रिल २०२० रोजी न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत असताना निधन झालं. त्यांच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली होती.
दरम्यान, या चित्रपटात सुरुवातीला रेखा यांना मुख्य भूमिका ऑफर करण्यात आली होती, पण त्यांनी श्रीदेवीचं नाव सुचवलं. हेच श्रीदेवीच्या करिअरमधील टर्निंग पॉइंट ठरलं. ‘चांदनी’तील संगीत आजही प्रेक्षकांच्या मनात गूंजतं. ‘मेरे हाथों में नौ-नौ चूडियां हैं’ किंवा ‘तेरे मेरे होते एक सपना’ सारखी गाणी आजही जुनी आठवण जागी करतात.



