जेजुरी येथील श्री मार्तंड देवसंस्थान कमिटीच्या वतीने भाविकांच्या सोईसुविधेसाठी विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच वैद्यकीय व समाजोपयोगी विकासकामे केली आहेत.
श्री मार्तंड देवसंस्थान कमिटी, जेजुरी (रजि. नं. ए ७०८/ पुणे) या न्यासाच्या विद्यमान विश्वस्त मंडळाची डिसेंबर २०१७ मध्ये नियुक्ती झाल्यापासून डिसेंबर २०२२ या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये सर्वधर्मीय भाविकांच्या सोईसुविधेसाठी पिण्याच्या शुद्ध पाण्याची व वापरण्याच्या पाण्याची कायमची सोय केलेली आहे.
सर्वधर्मीय भाविकांना जत्रा-यात्रा उसत्वाची माहिती मिळावी म्हणून हिंदू नव वर्षाप्रमाणे ‘मल्हार’ दिनदर्शिका छपाई करण्यात येते. गडकोटामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने मेटल डिटेक्टर बसविण्यात आलेले आहेत. बालमातासाठी हिरकणी कक्षाची निर्मिती करण्यात आलेली आहे. मुख्य मंदिर गाभारा वातानुकुलीत करण्यात आलेला आहे. सर्वधर्मीय भाविकांना रोज महाप्रसादाची सोय करण्यात आलेली आहे. नववधू-वरांना थेट दर्शनाची सोय करण्यात आलेली आहे.
कोरोना लॉकडाऊन कालावधीमध्ये जेजुरी पंचक्रोशीमध्ये जंतुनाशक फवारणी, गरीब, गरजू बेघर लोकांना रोजचे जेवणाचे पाकीट वाटप, अन्नधान्य कीट वाटप तसेच २०० बेडचे सुसज्ज कोविड केअर सेंटर उभारून हजारो रुग्णांना सेवा देण्यात आली. ससून रुग्णालयाला आयसोलेशण वार्ड करिता ५१ लक्ष रुपयांचा निधी देण्यात आला.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना बियाणे वाटप, डोंगराळ/दुर्गम भागातील शेतकऱ्यांना भात खाचरांच्या तालींची दुरुस्ती करून देण्यात आली. २०१९ च्या दुष्काळात जेजुरी व पंचक्रोशीमध्ये मोफत पाणीवाटप करण्यात आले. संपूर्ण दर्शन रांग व ओवरीमध्ये एसएस मधील बॅरीकेट व रेलिंग काम करण्यात आले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी डायलेसिस व डायग्नोस्टिक सेंटर उभारण्यात आले असून नाममात्र १०० रुपयांमध्ये डायलेसिस करण्यात येते. सर्व धार्मिय बिगरहुंडा मोफत सामुदायिक विवाह सोहळा २०१८, २०१९ व २०२२ रोजी करण्यात आले. श्री खंडोबा मंदिर तिन्ही पायरी मार्गांना, दगडी पायºयांना टाचा मारण्याचे काम करण्यात आले आहे. श्री खंडोबा मंदिराच्या दक्षिण बाजूस घोड्याची पागा बनविली आहे. श्री खंडोबा मंदिर व मल्हार भक्तनिवास येथे पाण्याचा आरओ प्लांट सुविधा काम करण्यात आले आहे. अद्ययावत २ घंटागाड्या कचरा वाहतुकीसाठी जेजुरी नगरपरिषदेस दिल्या आहेत. कडेपठार मंदिराकरिता स्वतंत्र पाण्याची पाईप लाईन करण्यात आली आहे.
कोविड काळात ज्या विद्यार्थ्यांचे पालक (माता किंवा पिता) कोरोनामुळे मयत झालेले आहेत किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल मागासलेले आहेत अशा १८ शाळा / महाविद्यालयामधील साधारण ६६ विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रवेश फी रक्कम देवसंस्थानतर्फे भरण्यात आली. कोविड कालावधीमध्ये जिल्हा परिषदेच्या इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंतच्या ४७ शाळांना मराठी, गणित व इंग्रजी या तीन विषयांचे १०,१५० संच (संचात प्रत्येक विषयाची ३ पुस्तके याप्रमाणे एकूण ३०,४५० पुस्तके) स्वाध्यायमाला संचाचे वाटप करण्यात आले. त्यामुळे गोरगरीब व गरजू अशा ज्या विद्यार्थ्यांची भ्रमणध्वनी (मोबाईल) खरेदी करण्याची आर्थिक क्षमता नव्हती अशा विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी मदत झाली.

साधारण जुलै २०१९ मध्ये राज्यात अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी तत्काळ मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला रुपये ११ लाख एवढ्या रकमेचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. श्री मार्तंड देवसंस्थान या न्यासाच्या मालकीच्या व श्री खंडोबा देवांच्या वेगवेगळ्या नावाने साधारण १२२ एकर इनाम शेतजमिनी शोधून काढून परिशिष्ट १ ला नोंद करण्यासाठी दिलेल्या आहेत. अशी सर्वधर्मीय भाविकांच्या सोईसुविधेसाठी विविध धार्मिक, वैद्यकीय व समाजोपयोगी विकास कामे श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने करण्यात आलेली आहेत.