मुख्य स्टोरी
पिंपळगाव, निफाड, येवला, इगतपुरी, सिन्नर, चांदवडमधील वकिलांचा परिवर्तन पॅनलला उस्फूर्त पाठिंबा

नाशिक : दि नाशिक डिस्ट्रीक्ट अॅडव्होकेट्स मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी लि., नाशिक या संस्थेच्या दि. १० मार्च २०२३ रोजी होवू घातलेल्या सन २०२३-२०२८ च्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचारासाठी परिवर्तन पॅनलच्या वतीने पिंपळगाव, निफाड, येवला, चांदवडमधील वकील बंधू-भगिनींशी संपर्क करण्यात आला. या प्रचार दौऱ्यात परिवर्तन पॅनलचे सर्व उमेदवार तसेच त्या त्या न्यायालयातील वकील संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी परिवर्तन पॅनलची भूमिका सभासदांना समजावून सांगण्यात आली.

नाशिक जिल्हा वकील सोसायटीच्या या निवडणुकीत प्रस्थापितांची एकााधिकारशाही मोडीत काढून लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी परिवर्तन पॅनलची निर्मिती केल्याचे तसेच सभासद वकिलांचा सर्वांगिण विकास तसेच संस्थेची उन्नती असाच परिवर्तन पॅनलचा संकल्प असल्याचे मनोगत उमेदवारांनी व्यक्त केले. परिवर्तन हा निसर्ग नियम आहे, प्रस्थापितांचे वर्चस्व आणि एककल्लीपणा संपुष्टात आणण्यासाठीच सभासद बंधू आणि भगिनींनी परिवर्तन पॅनलच्या ‘छत्री’ या निशाणीलाच मत देवून पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन उमेदवारांनी सभासदांना केले. या प्रचार दौऱ्यात पिंपळगाव, निफाड, येवला, इगतपुरी, सिन्नर, चांदवड वकील संघातर्फे परिवर्तन पॅनलला उस्फूर्त पाठिंबा दर्शविण्यात आला.





