मुख्य स्टोरीविशेष भाष्य

लव्ह-जिहाद !

- तमन्ना इनामदार

तमन्ना इनामदार

लेखिकेचा परिचय :

मुस्लीम बलुतेदार, एससी, एससी, एनटी, व्हीएनटी आणि ओबीसी जातीजमातींवर संशोधन आणि प्रत्यक्ष भेटीसाठी मागील पाच वर्षांपासून महाराष्ट्रभर दौरे करीत असतात. त्यांनी या विषयावर ३ पुस्तकेही लिहिली आहेत. महिला, राष्ट्रीय एकात्मता या विषयावर त्यांनी आजवर राज्यभरात ५० च्या वर व्याख्याने दिली आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बहि:शाल व्याख्याती म्हणून काम करीत असतानाच स्कूल कौन्सिलिंग आणि लाईफ स्कील वर्कशॉप घेत असतात.

——-

या उक्तीचा आणि त्या अंतर्गत होणाऱ्या वृत्तीचा  दुरान्वयेही काही संबंध नाही. तीव्र द्वेषापोटी उत्पत्ती झालेला हा शब्द आहे. लव्ह हा इंग्रजी शब्द, तर जिहाद म्हणजे संघर्ष हा अरबी शब्द आहे. आंतरधर्मिय लग्न करणाऱ्या जोडप्यांना बदनाम करण्यासाठी हल्ली हा शब्द प्रयोग होत आहे. त्यातही जर हिंदु मुलगी मुस्लीम मुलाबरोबर प्रेम वा लग्न करत असेल तर या शब्दाला तीव्र धार चढते. पण मुस्लीम मुलगी हिंदू मुलाबरोबर लग्न करत असेल, तर अस्मिला सुखावल्याने या कृत्याला ‘घरवापसी’ असे गोंडस नाव दिले जाते. वा फरक वा हा द्वेष जास्त करून गरीब, मागासवर्गीय, मध्यम वर्गीयांबाबत अधिक सक्रीय असतो. धनिक, नेते, राजकारणी मंडळीनी आंतरधर्मिय लग्न करून सगेसोयरे जोडले तर मात्र तो त्यांचा वैयक्तिक, खासगी बाब असते. व्यक्तीने प्रेम कोणावर करावे, लग्न कोणाशी याचे स्वातंत्र्य संविधान देते.
आंतरधर्मिय लग्न अलिकडच्या आठ-दहा वर्षात होत आहेत का, तर असा समज करून होणे म्हणजे या देशाचा इतिहास आणि या देशातील रिती-रिवाजांबाबत अज्ञान असणे होय। इतिहासात आंतरधर्मिय लग्नाचे अनेक दाखले, अनेक उदाहरणे आहेत.
आठव्या शतकाच्या आसपास जेव्हा इस्लाम भारतात आला काळापासून अनेक कारणांनी इथल्या नागरिकांनी इस्लाम स्वीकारल्यानंतरही आपापल्या भावकीत रोटी-बेटी व्यवहार केले. कुटुंबातील एक भाऊ मेहबूब होता, तर एक भाऊ महादेव होता.


आजही राजस्थानमध्ये अजमेर जवळच्या एका गावात ही परंपरा सुरू आहे. कोणी कोणत्याही धर्मातील व्यक्तीबरोबर लग्न, निकाह करू शकतो. होणाºया अपत्यांची नावेही हिंदू-मुस्लीम साम्यदर्शक असतात.
इथल्या सरदार-दरकदारांनी समाजातील प्रतिष्ठा, मानमरातब वाढविण्यासाठी मुस्लीम राजेमहाराजांशी मुलींची लग्ने करून सोयरिक जोडली.
राजकीय तडजोड किंवा अन्य कारणानेही हिंदू-मुस्लीम विवाह होत. उदाहरणार्थ बाजीराव पेशवा-मस्तानी व बादशहा अकबर आणि जोधाबाई.
पूर्वग्रह न ठेवता केवळ प्रामाणिक आणि संशोधन वृत्तीने निरीक्षण केल्यास आपल्या आसपास आंतरधर्मिय लग्न करून सुखा-समाधानाने आयुष्य जगणारी अनेक आनंदी जोडपी दिसतील. भांडण-तंटे तर अगदी बारकाईने बघून पडताळून, चौकशी, पाहण्याचा कार्यक्रम करून लग्न केलेल्या जोडप्यातही होतात. नात्यात कडवटपणा येतो, घटस्फोटही होतात. अलीकडच्या सर्वेक्षणानुसार घटस्फोटाचे प्रमाण अत्यंत वाढलेले आहे. पण ती सारीच जोडपी आंतरधर्मिय लग्न केलेली नसतात. यावरुनची काय तो अंदाज येतो.

अधेमध्ये व्हॉटस्अ‍ॅपवरचे दोन्ही धर्माचे चॅटवीर पोस्ट व्हायरल करतात. त्यात विरुध्द धर्माच्या लोकांनी आपल्या धर्मातील मुलींना फूस लावून पळवतात, लग्न करतात, नंतर सोडून देतात वा धर्म बदलायला लावतात. याबदल्यात त्यांना त्यांना पैसे, मालमत्ता मिळते.  तेव्हा आपल्या मुलीवर लक्ष ठेवा, त्यांच्या येण्या-जाण्यावर, मोबाईलवर लक्ष ठेवा. त्यांच्या घरी कळवा असा आशय असतो. त्याचवेळी मुलांवर लक्ष ठेवा. त्या वर्तनावर नियंत्रण ठेवा. या मुलांचे प्रबोधन करा. समजवा असे संदेश नसतात. या सज्ञान असणाऱ्या सगळ्याच मुली, मुर्ख, बावळट आहेत. त्यांना अक्कल नाही, त्यांना कोणीही फसवू शकतो असा स्त्रीयांचा उपमर्द करणारा संदेश असतो.
जर एखाद्यासकडून जाणिवपूर्वक मुलीला फसवले जात असेल तर त्यासाठी कायदे आहेत. शिक्षा आहे. यंत्रणा आहेत. आपला देशातील कायद्यांवर, यंत्रणेवर, न्याय व्यवस्थेवर विश्वास हवा. वाईट ते वाईटच. त्याला पाठीशी घालणे म्हणजे अनेक कुटुंबांवर संकट घोंघावणे. अशांचा वेळीच बंदोबस्त व्हायला हवा याबाबत दुमत नाही. पण सरसकट करून द्वेष पसरवणे, हिंसेला संमती देणे म्हणजे एखाद्या धर्मसमुहाला बदनाम करणे ठरते.


Related Articles

Back to top button