मुख्य स्टोरीविशेष भाष्य

लव्ह-जिहाद आणि धार्मिक रंग

पुरुषोत्तम आवारे-पाटील 

पुरुषोत्तम आवारे-पाटील

मुळात लव्ह-जिहाद नावाचा कोणताही प्रकार इस्लामच्या कुण्या ग्रंथात उपलब्ध नाही. मुसलमान हिंदू मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून पुढे जो काही अमानवीय व्यवहार तिच्याशी करतात त्या कृतीला हिंदुत्ववादी आणि हिंदूंनी लव्ह-जिहाद असे म्हणायला सुरुवात केली आहे. सगळेच मुसलमान तरुण असे ठरवून हिंदू मुलींना जाळ्यात ओढतात असेही नाही. सामाजिक चळवळीत आजवर जे हिंदू मुस्लिम विवाह झाले आहेत त्यांचे संसार उत्तम सुरु आहेत. अनेक उदाहरणे तर अशी आहेत की मुस्लिम तरुणाशी प्रेमविवाह केल्यावर तिचे धर्मपरिवर्तन पण झालेले नाही. अजूनही अनेक कुटुंबात दोघांनी विचारपूर्वक आपापले धर्म स्वातंत्र्य अबाधित ठेवले आहे. दोन्ही धर्माचे सण, उत्सव आणि धार्मिक परंपरा एकाच घरात पाळल्या जातात. त्याचे प्रमाण मात्र नगण्य आहे. असे मुस्लिम तरुण सहसा नास्तिक झाल्याचे आढळते.
मग लव्ह-जिहाद आहे काय? तर लव्ह-जिहाद शब्द नसेल, पण कृती आहे. प्रत्येक हिंदू मुस्लिम प्रेमविवाह हा लव्ह-जिहाद नाही, पण इस्लामच्या आज्ञा त्यामागे नसतील असेही ठामपणे सांगता येणार नाही. लव्ह-जिहाद या प्रकारावर बोलताना लिबरल, पुरोगामी किंवा डाव्या विचारांच्या लोकांची मोठी पंचाईत होते. पुरोगामी व्हायचे म्हणजे हिंदू धर्माची सोडून कुणाचीही चिकित्सा करायची नाही असे ठरलेले असते. मुस्लिमांची सामाजिक विषयावर बाजू घेताना त्यांच्या सगळ्याच चुका पोटात घेण्याची जी घोडचूक पुरोगामी करतात ते अधिक भयंकर आहे. मुळात अल्पसंख्यक समूहाच्या बाजूने बोलणे, त्यांच्यावर होणाºया अन्याय, अत्याचाराला वाचा फोडणे, त्यांची सामाजिक स्थिती मांडणे आणि धार्मिक रुढींवर, चुकांवर बोलणे या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. परंतु पुरोगामी तेच मानायला तयार नाहीत. त्यामुळे सगळा घोळ झाल्याचे दिसून येत आहे.


आजकाल डाव्या किंवा काँग्रेस परंपरेतल्या लोकांनी ‘इस्लामोफोबिया’ हा शब्द त्यासाठी शोधून काढला आहे. तुम्ही जर का इस्लामच्या गं्रथाची चिकित्सा करायला लागलात की हा शब्द किंवा त्याचा टॅग तत्काळ तुम्हाला चिकटवला जातो. लव्ह-जिहाद, जिहाद, गझवा ए हिंद किंवा काफिर, मुश्रीक, मोमीन अशा सगळ्या संकल्पना समजून घ्यायच्या असतील तर तुम्हाला कुराण, हदीस आणि इतर इस्लामिक ग्रंथांचे वाचन करावे लागते. हे सगळे ग्रंथ अरबी भाषेत असले तरी आता त्याचे  सगळ्या भाषेत भाषांतर सहज उपलब्ध आहे. इंटरनेट भारतात येण्यापूर्वी अनेक अडचणी होत्या. मात्र इंटरनेट आल्यावर कुराण, हदीस आणि इतर सगळे धार्मिक ग्रंथ अधिकृत इस्लामिक संस्थांनीच नेटवर उपलब्ध करून दिले आहेत. त्याचा अभ्यास केल्यावर इस्लामचे खरे रंग ओळखू येण्यास मदत होते. अलीकडे युट्युबवर एक्स मुस्लिमांनी जे विविध चॅनेल सुरु केले आहेत त्याचीही मूळ इस्लाम समजून घेण्यात भरपूर मदत होते.

मुळात इस्लाम ही एक राजकीय विचारधारा आहे. जगाच्या सगळ्या धर्मात जे धार्मिक तत्वज्ञान सांगितले आहे त्याचा इस्लामच्या कोणत्याही ग्रंथात पत्ता लागत नाही. जगातील सगळे मोमीन एक आहेत, भाऊ आहेत. अल्लाहने हे जग केवळ आपल्यासाठी निर्माण केले आहे. इस्लाम ज्यांना कुबुल नाही आणि पैगंबर मोहम्मद यांना जे रसूल मानत नाहीत ते सगळे इस्लामच्या नजरेत काफिर आहेत. काफिरांना कोणत्याही मार्गाने म्हणजे धर्मांतर करून किंवा जिवाने मारून संपवणे आणि इस्लामची संपूर्ण जगावर एकहाती सत्ता आणणे हेच प्रत्येक मुस्लिमांचे जगण्याचे ध्येय आणि उद्देश असला पाहिजे असे कुराण सांगते. इस्लाम म्हणजे बंधुभाव आणि शांती अशा ज्या वल्गना मुस्लिम मुल्ला, मौलवी करतात ते नेहमी अर्धसत्य सांगत असतात. इस्लाम भाईचारा सांगतो, पण तो केवळ मोमीनपुरता म्हणजे मुंबईत कुण्या फ्लॅट शेजारी राहणारा हिंदू हा कोणत्याही मुस्लिमाचा भाऊ असू शकत नाही. जगातील कोणत्याही देशात राहणारा अनोळखी मुस्लिम त्याचा भाऊ असेल, म्हणूनच जगात कुठेही मुस्लिमांवर अत्याचार झाले तर इथे महाराष्ट्रात किंवा भारतात त्याचे रक्तरंजित पडसाद उमटतात.

लव्ह-जिहाद मागे होणारी कृती इस्लामने दिलेल्या मूळ शिकवणुकीच्या संदर्भाने म्हणूनच घेण्याची गरज आहे. भलेही लव्ह-जिहाद या शब्दाचा मुस्लिम कुठेही वापर करीत नसतील, मात्र त्या कृतीला ते जिहाद म्हणून बघतात हे लक्षात घ्यायला हवे. राहिला प्रश्न या प्रकरणांना धार्मिक रंग देण्याचा, तर हा विषयच धर्माशी निगडित असल्याने त्याला धार्मिक रंग किंवा हिंदू मुस्लिम वादाचे स्वरूप येणे अपरिहार्य आहे. अलीकडे दुर्गोत्सवात गरब्याच्या मंडपात किंवा दांडियामध्ये शिरलेल्या अनेक मुस्लिम तरुणांना पोलिसांनी पकडल्याच्या घटना विविध शहरात घडल्या, त्या काय सांगतात? इस्लाममध्ये गाणे, नृत्य किंवा इतर धर्मियांच्या समारंभाला हजेरी लावणे हराम असताना हे तरुण तिथे कशासाठी जाण्याचा आटापिटा करतात? शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस आणि आयटी समूहात हिंदू मुलींना जाळ्यात ओढण्यासाठी विशेष सुविधा का उपलब्ध करून दिल्या जातात? याच्या खोलात गेल्यावर लव्ह-जिहाद शब्द अस्तित्वात नसताना मोहीम मात्र जिवंत असल्याचे भीषण सत्य सापडते.

Related Articles

Back to top button